प्रेम म्हणजे लळा
मनाचा छंद
प्रेम म्हणजे विरंगुळा
मानत नाही बंध
माझे काय?
प्रेम म्हणजे विश्वास
तुझे काय?
तुटण्या अगोदरचा प्रवास
बघ माझ्या यातना मी लपवल्या
तुझ्या दुःखावर हसण्या
शिक डोळ्यातील पाणी लपवण्या
नाहीतर हो तैयार जखमेवरच मीठ सोसण्या
मी असाचं
तू तुझ ठरवं
तू प्रेमळ तुझा गुणदोष कळवं
हिम्मत असेल तर ते माझ्याकडून मिळवं
नाहीतर कठोर ठरवं
अन् दूर रहा
दगड ठरवं
अन् सोसत रहा
प्रेम दुर्मिळ असते
प्रत्येकाचे जगावेगळे असते
आईचे बाळावर असते
बापाचे पण मुलांवर असते
मजबूरी अडचणींचा राडारोडा असतो
गरजांचा पांगळा व्यवहार असतो
देणारा देत जातो
घेणारा धर्मात असतो
घेणारा देणारा होईलच असा नसतो
उलटा प्रवाह कुठे भेटतो ?
काळ विचित्र भविष्यकार असतो
विधिलिखिताच पान बनून सतत भेटत असतो
कधी नात्यांमध्ये दुषणांचा विवर असतो
प्रेम करुणेचा अवडंबर असतो
तनाला मनोरुग्णाचा विकार असतो
मनाला सौंदर्याचा कुठे तिरस्कार असतो ?
चित्तचोर प्रेम कृष्ण लिलांचा खेळ असतो
सुकुमार दंग प्रेमात राधेचा शामरंग असतो
सुस्वर गंध प्रेमाचा मीरेला पाषाणी भासतो
अनुराग माधवाचा रुक्मीणीस ही दुर्मिळ वाटतो










