सत्य

कोणाशी ही वादास आता मन नाही करत

तू बरोबर मी चूक फरक नाही पडत

विचारांची लढाई विचारांनी लढलो

अन् कुठून सुरू केले होते तेच विसरलो

खरे चेहरे खोटे मुखवटे हुबेहुब झाले

सत्य असत्य काही नसते सहज सिद्ध झाले

एकाचे सत्य दुसऱ्याचे असत्य झाले

अन् चेहरे मुखवटे अंतर मिटले

रंग चेहऱ्याचे असे रक्तात भिनले

विचारांना ही गणवेश लाभले

चढाओढ वाद खडाजंगी झाले

अन् मनामध्ये सत्य असत्याने मारले

2 thoughts on “सत्य

Leave a comment