सारे काही संपले आहे,
त्यापलिकडे तूझे अस्तित्व आहे,
असंभव स्वप्न तूच दाखवतो आहेस,
खडतर मार्गावर वेळोवेळी हात पकडतो आहेस,
मी गुण-अवगुणांचा गुलाम आहे,
मी-मी मध्ये अडकतो आहे,
अभिमान,गर्व यामध्ये पुसटशी रेषा आहे,
कितीदा तूच जाणीव करून देत आहे,
मी विसराळू आहे,
अहं माझा मोठा आहे,
प्रत्येक वेळी तूझे कारण आहे,
संकटांबरोबर तूझे अस्तित्व आहे,
माझी दृष्टी कमजोर मनावर भयाचे अधिराज्य आहे,
तू अदृश्य अजूनही बोट माझे पकडतो आहे.

अतिशय सुंदर आहे
दृश्य अदृश खेळ आता पृथ्वी वर नांदतो आहे
LikeLike
Thanks
LikeLike